रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या संघर्षाबाबत पुतिन यांच्यावर नाराजी व्यक्त करत ट्रम्प यांनी रशियाला धमकीवजा इशारा दिला आहे. ते म्हणाले, जर व्लादिमीर पुतिन यांनी पुढील ५० दिवसांत युक्रेनसोबत युद्धबंदी करण्यास सहमती दर्शवली नाही तर रशियाविरुद्ध कठोर टॅरिफ लागू करण्यात येईल, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
...१०० टक्के टॅरिफ असेल
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "युक्रेनबरोबरील युद्धबंदी करण्यास रशियाने सहमती दर्शवली नाही आणि ५० दिवसांत युद्धबंदी करार झाला नाही तर आम्ही रशियावर दुय्यम कर लादणार आहोत आणि मग ते १०० टक्के टॅरिफ असेल", असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
आतापर्यंत कोणत्या देशांवर किती टक्के टॅरिफ?
१. म्यानमार - ४० %
२. लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक - ४० %
३. कम्बोडिया - ३६ %
४. थायलंड - ३६ %
५. बांगलादेश - ३५ %
६. रिपब्लिक ऑफ सर्बिया - ३५ %
७. इंडोनेशिया - ३२ %
८. दक्षिण आफ्रिका - ३० %
९. बोस्त्रिया अँड हर्झगोविना - ३० %
१०. जपान - २५ %
११. दक्षिण कोरिया - २५ %
१२. मलेशिया - २५ %
१३. कझाकिस्तान - २५ %
१४. रिपब्लिक ऑफ ट्युनिशिया - २५ %
१५. अल्जेरिया - ३० %
१६. इराक - ३० %
१७. श्रीलंका - ३० %
१८. लिबिया - ३० %
१९. मोल्डोवा - २५%
२०. ब्रुनेई - २५ %
२१. फिलीपिन्स - २० %
२२. ब्राझील - ५० %