कर्नाटकमध्ये तूर्तास तरी मुख्यमंत्रीबदल नाही

    01-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली
: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाबद्दलच्या चर्चांना काँग्रेस हायकमांडने पूर्णविराम दिला आहे. काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री राहतील असे स्पष्ट केले आहे.

पत्रकारपरिषदेत रणदीप सुरजेवाला म्हणाले, अनेक आमदारांनी नेतृत्व बदलाची मागणी केली होती. मात्र, आमदारांना काही अडचणी असल्यास त्यांनी त्याविषयी जाहिर वाच्यता करू नये. त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर येऊन बोलावे. त्याचप्रमाणे सरकारविषयी काही समस्या असल्यास त्यांनी मुख्यमंत्र्यांशीही संवाद साधावा, असा सल्ला सुरजेवाला यांनी यावेळी दिला. यावेळी पत्रकारपरिषदेत डीके शिवकुमार हे सुरजेवाला यांच्या शेजारीच बसले होते.

सुरजेवाला यांनी आरोप केला की, नेतृत्व बदलावरून भाजपने गोंधळ निर्माण केला होता. कर्नाटक राज्य सरकारला अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न असून ते जनादेशाची पायमल्ली करत असल्याचेही सुरजेवाला म्हणाले.