मध्य रेल्वे मुंबई विभाग मालवाहतूक विक्रमी कामगिरी

Total Views |


मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एप्रिल ते मे २०२५ या कालावधीत एकूण ३.४३ दशलक्ष टन मालाची लोडींग केली असून, मे २०२५ मध्ये १.७७ दशलक्ष टन मालाची लोडींग झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने कंटेनर लोडिंग क्षेत्रात विशेष वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल-मे २०२५ या कालावधीत एकूण १.६५ दशलक्ष टन कंटेनरची लोडींग झाली, जी मागील वर्षी २०२४-२५ याच कालावधीतील १.३३ दशलक्ष टनपेक्षा अधिक आहे. मे २०२५ मध्ये ०.७७ दशलक्ष टन मालाची लोडींग झाली, जी मे २०२४ मधील ०.६९ दशलक्ष टनपेक्षा जास्त आहे. मे २०२५ मध्ये एकूण ६५० कंटेनरची वाहतूक झाली, तर मे २०२४मध्ये ५९५ कंटेनर भरण्यात आले.

मुंबई विभागाने पेण येथून माणगाव येथील पोस्को स्टील कारखान्यापर्यंत रस्त्याने होणारी एचआर कोईल्स (गरम रोल केलेली लोखंडी पट्टे) ची वाहतूक रेल्वेमार्गावर वळवण्यात यश मिळवले आहे. दि. १४ मे २०२५ रोजी कळंबोली मालधक्क्यावरून पहिली मालगाडी भरली गेली. हे मालधक्के ३० जानेवारी २०२५ रोजी कंटेनर मालगाड्यांचे टर्मिनल म्हणून अधिसूचित करण्यात आले होते. येथून दरमहा सरासरी ७ मालगाड्या भरल्या जातील अशी अपेक्षा आहे. मुंबई विभागाने मालवाहतूक वाढवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. यामुळे माल चढाईच्या कामगिरीत सातत्यपूर्ण प्रगती होत असून, महत्त्वपूर्ण वाढ साधण्यात विभागाला यश आले आहे.

मालवाहतुकीचा तपशील (एप्रिल ते मे २०२५):

लोखंड व पोलाद – ०.६८ दशलक्ष टन

कोळसा – ०.४८ दशलक्ष टन

खते – ०.३९ दशलक्ष टन

इतर वस्तू – ०.२५ दशलक्ष टन

मे २०२५ महिन्यातील चढाईचा तपशील:

कोळसा – ०.३४ दशलक्ष टन

लोखंड व पोलाद – ०.३१ दशलक्ष टन

खते – ०.२१ दशलक्ष टन

इतर वस्तू – ०.१४ दशलक्ष टन

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.