
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : छत्तीसगडच्या जगदलपूर येथील एका सरकारी नर्सिंग कॉलेज कॅम्पसमधून शिवलिंग हटवण्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. संस्थेतील इस्लाम समर्थक विद्यार्थीनींच्या तक्रारींनंतर व्यवस्थापनाने कॉलेज कॅम्पसमधील शिवलिंग काढून टाकल्याची माहिती आहे. महाविद्यालयातील 'वातावरण बिघडू नये' म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचा युक्तिवाद संस्था व्यवस्थापनाने केलाय.
वास्तविक कॉलेजमधील वसतिगृहात हिंदू आणि इस्लाम समर्थक विद्यार्थिनी एकत्र राहतात. काही दिवसांपूर्वी, खाण्यापिण्यावरून आणि पूजापाठवरून किरकोळ वाद झाला होता, परंतु जेव्हा त्यात धार्मिक ओळख जोडली गेली आणि त्यानंतर शिवलिंग परिसरातून काढून टाकण्यात आले. संस्थेच्या आवारातून शिवलिंग हटवल्यानंतर विद्यार्थिनी संतप्त झाल्या आणि त्यांनी व्यवस्थापनाविरुद्ध घोषणाबाजी करत उपोषण सुरू केले. या वादात ज्या दोन प्रमुख व्यक्तींची नावे आली आहेत ते म्हणजे महाविद्यालयाच्या प्राचार्य स्वर्णलता पीटर आणि वॉर्डन अर्जिया अली खान.
हिंदू संघटनांनी घटनास्थळी पोहोचून निषेध करत म्हटले की शिवलिंग काढून टाकण्यात आले नाही तर त्याचा अपमान करण्यासाठी जाणूनबुजून फेकण्यात आले. नर्सिंग कॉलेजमधील वादानंतर जिल्हाधिकारी, एसपी आणि इतर उच्च अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी आले. संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर, त्यांनी विद्यार्थिनींच्या मागणीला मान्यता दिली आणि कॅम्पसमध्ये शिवलिंग स्थापित करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर, संस्थेच्या परिसरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या हस्ते पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. शिवाय सर्व विद्यार्थिनींना भगवान शिवाची मूर्तीदेखील भेट देण्यात आली.