काँग्रेसची पाकिस्तानी मानसिकता पुन्हा उघड! नाना पटोलेंचं बेताल विधान, म्हणाले...

12 Jun 2025 11:42:09



मुंबई :
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या बेताल वक्तव्याने काँग्रेसची पाकिस्तानी मानसिकता पुन्हा उघड झाली आहे. ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे, असे ते म्हणाले. यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.

नाना पटोले म्हणाले की, "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा दोन्ही देशांना तुम्ही युद्धविराम करा, अन्यथा आम्ही तुमचा व्यापार थांबवू अशी धमकी दिली. त्यांच्याच इशाऱ्याने ऑपरेशन सिंदूर थांबवले गेले. आम्ही कोणकोणत्या जागांना टार्गेट करणार आहोत, तिथून तुमच्या लोकांना दूर करा, असे पाकिस्तानला आधीच सांगण्यात आले. याचा अर्थ कॉम्प्युटर रुममध्ये लहान मुलं जो गेम खेळतात तो गेम खेळण्यात आला आहे," असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

हे वाचलंत का? - नाना, तुमचं मन आणि मेंदू भ्रष्ट झालाय! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून पटोलेंचा खरपूस समाचार

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांना बळी गेला. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. यात भारताकडून पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. मात्र, आता याच ऑपरेशन सिंदूरबाबत नाना पटोलेंनी वादग्रस्त विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.



Powered By Sangraha 9.0