नवी दिल्ली: अब्जाधीश गुंतवणूकदार आणि जगप्रसिद्ध उद्योगपती वॉरेन बफेट यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी बर्कशायर हॅथवे कंपनीच्या बैठकीत ही घोषणा केल्याचे समजते. या आर्थिक वर्षाखेरीस ते सीईओ पदाचा राजीनामा देतील आणि कंपनीचे नेतृत्व नवीन सीईओ ग्रेग एबेल यांच्याकडे सोपवतील.
बफेट यांनी आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, "बर्कशायर हॅथवेचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे आणि ग्रेग एबेलच्या नेतृत्वात कंपनी उत्तम कामगिरी करेल, माझ्यामते आत्ता कंपनी नवीन व्यक्तीकडे सोपवण्याची योग्य वेळ आहे." ग्रेग एबेल सध्या हॅथवेच्या बिगर विमा व्यवसायाचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांनी गेल्या काही वर्षांत उत्तम यश मिळवले आहे.
बर्कशायर हॅथवे ही अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ३४७.७ अब्ज डॉलर ही कंपनीची किंमत आहे, ज्यातून कंपनीचे आर्थिक स्थैर्य दिसून येते. वॉरेन बफेट यांचे अर्थजगतातील योगदान फार मोठे असून त्यांनी बर्कशायर हॅथवेला जगातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक बनवले.
बफेट यांची निवृत्ती हा गुंतवणूक विश्वासाठी एक महत्त्वाचा विषय आहे त्याचबरोबर आता सर्वांचे लक्ष ग्रेग एबेल हे सीईओ पद कसे निभावणार ह्याकडे आहे सुद्धा आहे.