तनिषा भिसेंच्या बाळांसाठी मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात! उपचारासाठी तब्बल २४ लाखांची मदत

    03-May-2025
Total Views |
 
Tanisha  Bhise
 
मुंबई : पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात एक नवीन माहिती पुढे आली आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूची गंभीर दखल घेत त्यांच्या दोन्ही बाळांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत २४ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.
 
पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वेळेवर उपचार न केल्याने दोन जुळ्या बाळांना जन्म देऊन तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
 
हे वाचलंत का? -  नवी मुंबईत जागतिक थीम पार्कबाबत राज्य शासन सकारात्मक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध समित्या गठित करून डॉ. सुश्रूत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आता तनिषा भिसे यांच्या दोन लहान बाळांना आजारावर पुढे उपचार घेता यावेत यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून एका बाळाच्या उपचारासाठी १४ लाख रुपये आणि दुसऱ्या बाळाच्या उपचारासाठी १० लाख रूपये असे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या दोन्ही बाळांवर सध्या पुण्यातील सुर्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.