ठाणे : नाशिक जिल्ह्यात उबाठा गटाला मोठा झटका बसला आहे. माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह उबाठा गटाच्या उपनेत्या, अनेक पदाधिकारी आणि इगतपुरी तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १५०० महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
बुधवार, २८ मे रोजी ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेनाप्रणित शिक्षक सेनेच्या राज्य प्रमुख आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, शिवसेना सचिव राम रेपाळे, नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
हे वाचलंत का? - अभिनेता दिनो मोरियाच्या अडचणीत वाढ! आर्थिक गुन्हे शाखेकडून सलग तिसऱ्या दिवशी चौकशी
निर्मला गावित यांच्यासोबत श्रमिक वर्तमान कामगार संघटनेच्या शालेय पोषण आघार समितीचे अध्यक्ष शरद लोहकरे पाटील, तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पवार, नाशिक जिल्हा परिषदेच्या उबाठाच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित, सोमनाथ जोशी, मोतीराम दिवे, गणपत वाघ, मथुराताई जाधव, संदिप शिवराम जाधव, गणेश जाधव, साहेबराव धोंगडे, शरद कुटके, गुलाबराव वाजे, रमेश शिंदे, विलास मालुंजकर, अंबादास माडी, मधुकर पंडित झोले, नाना वारे, रमेश शेंडे, रमेश भोये, दिलीप घोरपडे, तुकाराम चौधरी, लालचंद चव्हाण, पवन दळवी, पुंडलिक कनोजे या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या योजना कदापि बंद होणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिलेली आश्वासने टप्प्याटप्याने पूर्ण करणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक याप्रमाणे काम करा. तसेच शालेय पोषण आहार योजनेसाठी काम करणाऱ्या महिलांचा मानधनवाढीचा विषयाबाबत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून सकारात्मक मार्ग काढू," असे आश्वासन त्यांनी दिले.