पावसाळी पर्यटन करणाऱ्या युवराजांना आशिष शेलारांनी दाखवला आरसा!

26 May 2025 15:14:39
 
Aditya Thackeray & Ashish Shelar
 
मुंबई : राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून विशेषत: मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पावसाळी पर्यटन करणारे युवराज आदित्य ठाकरे यांना मंत्री आशिष शेलार यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करून चांगलाच आरसा दाखवला.
 
 
 
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "२५ वर्षांपासून उबाठा सेना आणि बीएमसीच्या कंत्राटदारांनी मुंबईला लुटले. मुंबईच्या रस्त्यांवर बीएमसीने खर्च केलेले ३ लाख कोटी रुपये उबाठा सेना आणि कंत्राटदारांनी लुटले. उबाठा सेनेने २५ वर्षे मुंबईला पुरापासून वाचवण्यासाठी ब्रिमस्टोवाड प्रकल्पाचे काम पूर्ण का केले नाही?" असा सवाल त्यांनी केला.
 
हे वाचलंत का? -  मोठी बातमी! मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी अभिनेता दिनो मोरियाची चौकशी
 
ते पुढे म्हणाले की, "बोगस मिठी नदीच्या स्वच्छतेवर बीएमसीने १,००० कोटी रुपये खर्च केले. पब पार्टी नाईटलाइफ गँग आणि फिक्सरमधील केतन के याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. संपूर्ण मे महिन्यात मी, भाजप आमदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीएमसी नाल्याच्या स्वच्छतेच्या कामांची पाहणी करत होतो. त्यावेळी उबाठा सेना आणि त्यांचे युवा नेते कुठे होते? तेव्हा ते परदेशात आनंद घेत होते. आमचे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार भूतकाळातील उबाठा सेनेची पापे साफ करत आहे आणि फिक्सर्स, बोगस कंत्राटदारांवर कारवाई करत आहे, हाच उबाठा सेना आणि त्यांच्या युवा नेत्यांचा खरा राग आहे," अशी टीकाही मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0