नागपूर : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने कौतूकास्पद कामगिरी केल्याने देशभरात त्यांचा गौरव होत असताना काँग्रेसकडून मात्र, वारंवार त्यांचा अवमान करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवार, २१ मे रोजी असेच एक वादग्रस्त विधान केले आहे.
नागपूर येथे माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, "लोकशाहीमध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत प्रश्न विचारण्यात काय चूक आहे? आपले किती नुकसान झाले आहे? आपली किती जीवितहानी झाली? आपल्या किती सैनिकांचे नुकसान झाले?, आपल्या किती राफेलचे नुकसान झाले?, या सगळ्याची माहिती मिळायला हवी."
हे वाचलंत का? - पाऊस, बियाणे, ते कीड व्यवस्थापन...; खरीप हंगाम आढावा बैठकीत कोणते महत्वपूर्ण निर्णय? काय म्हणाले मुख्यमंत्री?
"पाकिस्तानने ५ हजार चायनामेड ड्रोन पाठवले. त्या ड्रोनची किंमत १५ हजार रुपये आहे. त्याने काहीही होत नाही. आपल्या क्षेपणास्त्राची किंमत १५ लाख रुपये आहे. एक ड्रोन पाडण्यासाठी आपण १५ लाखांचे क्षेपणास्त्र डागले. यामागे चीनची पॉलिसी होती, अशीही चर्चा आहे. सत्य काय आहे ते मला माहिती नाही. पण असे ५ ते ६ हजार चीनी ड्रोन भारतात पाठवले आणि ते पाडण्यासाठी आपण १५ लाखांचे क्षेपणास्त्र सोडले. तसेच आपली तीन ते चार राफेल विमाने पाडल्याचीही चर्चा आहे," असे विधान विजय वडेट्टीवारांनी केले आहे.