दिल्ली : अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे अटक करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाच्या नेत्याने दिलेल्या तक्रारीनंतर सदर कारवाई करण्यात आली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सिंग म्हणाले की "अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे"
अशोका विद्यापीठाचे प्रतिनिधी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की " प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. आम्ही या प्रकरणाची सविस्तर माहिती घेत आहोत. आमचे विद्यापीठ तपासात पोलिस आणि स्थानिक अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करत राहील." हरियाणा राज्य महिला आयोगाने प्राध्यापकांना त्यांच्या ऑपरेशन सिंदूरच्या वक्तव्याबद्दल नोटीस पाठवल्यानंतर काही दिवसांनी ही अटक करण्यात आली आहे.