नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी पेंटागॉन अधिकारी मायकल रुबिन यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, भारताने लष्करी आणि राजनैतिक दोन्ही स्तरांवर अतिशय यशस्वी कामगिरी केली. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “भारताने फक्त शस्त्रानेच नव्हे, तर डिप्लोमसीच्या जोरावरही पाकिस्तानला पराभूत केले.” त्यांनी हेही सांगितले की, पाकिस्तानने युद्ध थांबवण्याची विनंती केली, हेच भारताच्या ताकदीचे लक्षण आहे.
रुबिन यांनी पाकिस्तानवर टीका करताना तो एक ‘अपयशी राष्ट्र’ असल्याचे म्हटले. त्यांनी असा सवालही उपस्थित केला की, जगाने पाकिस्तानला अजूनही दहशतवाद राष्ट्र का जाहीर केलेले नाही? त्यांच्या मते, पाकिस्तान बऱ्याच काळापासून दहशतवादाला पाठिंबा देतो, आणि आता भारताने त्याला योग्य उत्तर दिले आहे.
मायकल रुबिन यांनी भारताच्या ठाम भूमिकेचेही कौतुक केले. त्यांनी सांगितले की, भारताने युद्धाची वाढती शक्यता असतानाही आपला निर्णय ठाम ठेवला. या रणनीतीमुळे भारताने जागतिक स्तरावर आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती होतेय
इतिहासाचा संदर्भ देताना रुबिन म्हणाले, “प्रत्येक युद्धाची सुरुवात पाकिस्तानने केली आहे आणि तरीही त्यांनी स्वतःला विजयी समजलं. पण यावेळी हे चालणार नाही. कारण भारताने चार दिवसांतच दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तान यावर काहीच करु शकला नाही.