मुंबई : नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) तर्फे उपव्यवस्थापक पदासाठी ६० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट nhai.org वरून ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ९ जून २०२५ आहे.
या भरतीची अधिकृत सूचना १३ मे २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १० मे २०२५ पासून सुरू झाली असून, उमेदवारांना संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
एकूण जागा: ६०
पद: - उपव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता: बी.ई./बी.टेक
निवड प्रक्रिया: निवड थेट भरती प्रक्रियेद्वारे केली जाणार आहे.
अर्जाचा प्रकार: ऑनलाईन
अर्जाची अंतिम तारीख: ०९-०६-२०२५
उमेदवारांनी वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया व अर्ज कसा करावा यासंबंधीची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर पाहावी. ही अधिसूचना *nhai.org* या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.