नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी भारत-पाकिस्तानमधील सध्याच्या तणावाबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. ट्रम्प यांनी भारतीय हितांना बाधा आणण्याचा प्रयत्न करून पाकला अनुकूल बाबींचा उल्लेख केल्याची टिका थरूर यांनी केली आहे.
ट्रम्प यांच्या काश्मीर मुद्द्यावरील विधानांवर प्रतिक्रिया देताना थरूर म्हणाले की, ही टिप्पणी "भारतासाठी अत्यंत निराशाजनक" आहे आणि त्यामुळे दशकांपासून मिळवलेल्या कष्टाने मिळवलेल्या राजनैतिक भूमिकेस धोका निर्माण होईल असा इशारा त्यांनी दिला. समाजमाध्यमांवरील तीव्र शब्दातील पोस्टमध्ये ट्रम्प यांच्या टिप्पण्या चार महत्त्वाच्या बाबींवर भारतासाठी अत्यंत निराशाजनक आहेत आणि सीमापार दहशतवाद आणि काश्मीरबाबत भारताच्या दीर्घकालीन भूमिकेकडे दुर्लक्ष करणाऱ्या आहेत.
ट्रम्प यांच्या वक्तव्यातून भारत आणि पाक हे समान पातळीवर असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याद्वारे पाकच्या सीमापार दहशतवनादाच्या धोरणाकडे दुर्लक्ष करण्यात येत असून दहशतवादाविरोधातील अमेरिकेची भूमिकाही बाजुला पडत असल्याचे दिसते, असे थरूर म्हणाले. ट्रम्प यांनी वाटाघाटीची भाषा करून पाकला वैधानिक संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, दहशतवाद असताना वाटाघाटी होणार नाही, ही भारताची भूमिका कायम असल्याचेही थरूर यांनी नमूद केले आहे.
काश्मीर प्रश्नावर भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऑफरवर थरूर यांनी इशारा दिला की ट्रम्प यांच्या हस्तक्षेपाच्या भूमिकेमुळे काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करू इच्छिणाऱ्या दहशतवादी गटांच्या अजेंडाला चालना मिळते, असेही थरूर यांनी म्हटले आहे.