करमणूक क्षेत्र विकासाचे नवे इंजिन! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
वेव्ह्ज शिखर संमेलनाचे उद्घाटन संपन्न
01-May-2025
Total Views |
मुंबई : करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, १ एप्रिल रोजी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे 'वेव्ह्ज २०२५'चे उदघाटन संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे. आजच्या डिजिटल युगात आशय (कंटेंट) हे सर्वात वेगाने पसरत आहे आणि महाराष्ट्र या सर्जनशील क्रांतीच्या केंद्रस्थानी आहे. ही परिषद ही केवळ एक घटना नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली चळवळ आहे."
"राज्य सरकार अॅनिमेशन, गेमिंग, म्युझिक आणि डिजिटल माध्यमांना चालना देण्यासाठी अनुकूल धोरणे राबवत आहे. मुंबईतील ५०० एकरच्या फिल्मसिटीला नव्या पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टममध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. यातील १२० एकरमध्ये माध्यम आणि करमणूक शहर उभारण्यात येणार असून, अॅनिमेशन, VFX आणि गेमिंगसाठी हे केंद्र असेल," असे ते म्हणाले.