उबाठा गटाची गळती सुरुच! पुणे जिल्ह्यात महिला आघाडीला खिंडार

    13-Mar-2025
Total Views |
 
Shivsena
 
पुणे : गेल्या काही दिवसांपासून उबाठा गटात गळती सुरुच असून आता पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील उबाठा महिला आघाडीला खिंडार पडले आहे. बुधवार, १२ मार्च रोजी येथील असंख्य पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
 
पिंपरी चिंचवड येथील उबाठा गटाच्या पुणे जिल्हा महिला आघाडी संघटिका आणि माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा महिला आघाडी समन्वयक सुजाता काटे,शिवसेना संघटक संतोष सौंदाणकर आणि युवासेनेचे भोसरी विधानसभा शहर प्रमुख अजिंक्य उबाळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी सुलभा उबाळे यांची महिला आघाडी उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.
 
हे वाचलंत का? -  सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर परतीचा प्रवास पुन्हा रखडला! काय घडलं?
 
याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना महिला नेत्या मीनाताई कांबळी, आमदार प्रा.मनीषा कायंदे, शिवसेना सचिव वैभव थोरात तसेच पिंपरी चिंचवड येथील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासह उपशहर संघटिका शशिकला उभे, विभाग संघटिका भारती चकवे, शाखाप्रमुख कावेरी परदेशी, उपशाखाप्रमुख निर्मला पाटील, प्रिया जपे, नयना पारखे, उपशाखा संघटिका लीलावती देवकाते, दिपा जागते, गटप्रमुख स्मिता मोगरे, लीना नेहते, मंदा पाटील तसेच पुणे महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
 
तसेच उपशहरप्रमुख सुधाकर नलावडे, उपविभागप्रमुख गणेश झिळे, विभाग संघटक राजेंद्र पालांडे, उपविभागप्रमुख कौस्तुभ गोळे, शाखाप्रमुख महेश डोके, विजय घुले आणि इतर पदाधिकाऱ्यांनी देखील याप्रसंगी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.