मुंबई : वाल्मिक कराडच्या बातम्या बघितल्याने अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. बेदम मारहाण केल्यानंतर फरार झालेल्या दोन्ही आरोपींना कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय?
बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी बीडमधील धारूर गावात अशोक मोहिते हा त्याच्या मोबाईलवर वाल्मिक कराडशी संबंधित बातम्या पाहत होता. दरम्यान, वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोन आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. तसेच वाल्मिक कराड आणि मुंडेंच्या बातम्या पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकी आरोपींकडून अशोक मोहितेला देण्यात आली. अशोक मोहितेवर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे वाचलंत का? - नागपूर जिल्हा परिषदेसाठी १४२ कोटींचा निधी मंजूर! पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रयत्नांना यश
हे दोन्ही आरोपी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र आहेत. दरम्यान, या दोन्ही आरोपींना कर्नाटकमधून अटक करण्यात आली असून यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे आढळून आले आहे.