मुंबई : माझ्या आईनेच आमच्यावर हिंसा केली असून माझे वडील धनंजय मुंडे २०२० पासून आमची काळजी घेत आहेत, असे वक्तव्य सीशिव मुंडे याने केले आहे.
करूणा शर्मा या मंत्री धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असून त्यांनी पोटगी म्हणून त्यांना दरमहा २ लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर करूणा शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले. दरम्यान, आता त्यांचा मुलगा सीशिव मुंडे याने इन्स्ट्राग्रामवर एक पोस्ट केली असून ती सध्या चांगलीच चर्चेत आहे.
हे वाचलंत का? - करूणा शर्मांचे आरोप न्यायालयाकडून मान्य! धनंजय मुंडेंनी दरमहा २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश
"माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते कधीच आमच्यासाठी हानिकारक नव्हते. माझी आईच माझ्यावर, माझ्या बहिणीवर आणि माझ्या वडिलांवर हिंसा करायची. माझ्या आईने वडीलांचा छळ केल्यानंतर त्यांनी तिला सोडले. त्यानंतर तिने आम्हालासुद्धा निघून जाण्यास सांगितले. २०२० पासून आमचे वडील आमची काळजी घेत आहेत. माझ्या आईला कोणतीही आर्थिक अडचण नाही. ती काहीतरी कारणे सांगत असते. तिने घराचे हप्तेसुद्धा भरले नाहीत," असे सीशिव मुंडे याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.