करूणा शर्मांचे आरोप न्यायालयाकडून मान्य! धनंजय मुंडेंनी दरमहा २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश

    06-Feb-2025
Total Views |
 
Karuna Sharma
 
मुंबई : करूणा शर्मा यांची मागणी मान्य करत न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. करूणा शर्मा या मंत्री धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असून त्यांनी पोटगी म्हणून त्यांना दरमहा २ लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी याप्रकरणाची सुनावणी पार पडली.
 
हे वाचलंत का? -  वाल्मिक कराडच्या बातम्या बघितल्याने तरुणाला बेदम मारहाण!
 
करुणा शर्मा यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात घरघूती हिंसाचाराचा आरोप करत धनंजय मुंडेंच्या विरोधात याचिका दाखल केली होती. दरम्यान, करूणा शर्मा यांचे धनंजय मुंडेंवरील आरोप न्यायालयाकडून मान्य करण्यात आले आहेत. करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचे मान्य करत त्यांना प्रत्येक महिन्याला २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यातील १ लाख २५ हजार रुपये करुणा शर्मा यांना तर मुलगी शिवानी मुंडेला तिच्या लग्नापर्यंत दरमहा ७४ हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.