नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यावर उबाठा गट गप्प का? मंत्री नितेश राणे यांचा सवाल

26 Feb 2025 19:07:43
 
Nitesh Rane
 
सिंधुदुर्ग : नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यावर उबाठा गट गप्प का? असा सवाल मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी केला.
 
पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराजांचा एकेरी उल्लेख केला. केवळ कोकण पट्ट्यातच नाही तर महाराष्ट्रात, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा नरेंद्र महाराज यांचे कार्य मोठे आहे. विजय वडेट्टीवारांनी १०० जन्म घेतले तरी त्यांना नरेंद्रचार्य महाराजांच्या कार्याची बरोबरी करता येणार नाही. हे सगळे हिंदुद्वेषी आहेत. चुकून महाविकास आघाडीचे सरकार आले असते तर आमच्या साधू संताना तुरुंगात टाकण्याचा कार्यक्रम ते करणार असल्याचे माझ्या कानावर आले आहे. परंतू, महाराष्ट्राच्या हिंदु समाजाने एकत्र येऊन महायुतीचे सरकार आणल्याने त्यांचे सगळे मनसुबे धुळीस मिळाले. विजय वडेट्टीवारांनी नरेंद्र महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर उबाठा गट गप्प का? त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  मस्साजोग येथील ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित!
 
नीलम गोऱ्हे बोलल्या ते सत्यच
 
"शिवसेनेचा इतिहास ज्या लोकांना माहिती आहे, त्या प्रत्येकाला नीलम गोऱ्हे जे बोलल्या, ते सत्य असल्याचे माहिती आहे. उद्धव ठाकरे यांची असंख्य बिलेही एकनाथ शिंदेंनीदेखील भरली. उद्धव ठाकरेंच्या घरी जाणाऱ्या साड्या, परफ्यूम, गाडीचे पेट्रोल, खासगी विमाने आणि घरातील एसी देखील त्यांचा नाही. त्यामुळे नीलम गोऱ्हे काहीच वाईट बोललेल्या नाही. पण ते सत्य असल्याने मातोश्रीच्या वहिनींना झोंबले," असे ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0