मस्साजोग येथील ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित!

    26-Feb-2025
Total Views |
 
Dhananjay Deshmukh
 
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केले होते. बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
 
संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. तसेच फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करावी यासह विविध मागण्यांसाठी मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी मस्साजोग येथील ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते.
 
हे वाचलंत का? -  बांग्लादेशी घुसखोरांची पाळेमुळे सिल्लोडपर्यंत! किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
 
दरम्यान, या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर मस्साजोग येथील ग्रामस्थांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.