मुंबई : साहित्य संमेलनात झालेल्या राजकीय चिखलफेकीची जबाबदारी शरद पवार झिडकारू शकत नाहीत, असे विधान संजय राऊतांनी केले आहे. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले की, " साहित्य संमेलनात जी राजकीय चिखलफेक झाली त्याची जबाबदारी शरद पवारदेखील झिडकारू शकत नाहीत. ते जेष्ठ आहेत. ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते. पण यावेळी ज्याप्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि त्यात राजकीय चिखलफेक झाली याला ते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर आणि शरद पवार साहेबांनीसुद्धा यावर निषेध व्यक्त करायला हवा. शरद कसे गप्प राहू शकतात? त्यांच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - नीलम गोऱ्हेंकडून ठाकरेंची पोलखोल! उबाठा गटाचा जळफळाट
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला होता. उबाठा गटात दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्या की, एक पद मिळायचं, असे त्या म्हणाल्या. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.