महाकुंभाची तारीख मार्चपर्यंत वाढवली? काय आहे नेमकं सत्य?

19 Feb 2025 18:00:59

Mahakumbh Date Extended to March

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mahakumbh Date)
प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभात देश विदेशातून आलेल्या भाविकांची रेलचेल मोठ्याप्रमाणात सुरू आहे. पवित्र स्नान करण्याकरीती प्रयागराजला जाण्याचा विचार अजूनही काही भाविक करतायत. दि. १३ जानेवारी रोजी सुरु झालेल्या महाकुंभाचा समारोप दि. २६ फेब्रुवारी रोजी होतो आहे. मात्र ही तारीख मार्चपर्यंत वाढवण्यात आल्याची अफवा सोशल मीडियावर सध्या वेगाने पसरत आहे. यासंदर्भात प्रयागराजचे डीएम रवींद्र मंदाड यांनी निवेदन जारी केले असून ही केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.महाकुंभाचा समारोप २६ तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी होणार असल्याचे त्यात स्पष्टपणे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार डीएम म्हणाले की, 'महाकुंभमेळ्याचे वेळापत्रक मुहूर्तानुसार जाहीर केले जाते आणि ते अगोदर ठरवले जाते. त्यामुळे २६ फेब्रुवारीला नियोजित ठरल्याप्रमाणे महाकुंभाचा समारोप होईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका. तारीख वाढवण्याबाबत कुठलाही प्रस्ताव आलेला नाही.' २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री असल्याने अमृत स्नानाकरीता यादिवशी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0