माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नीचे निधन!

17 Feb 2025 12:55:48
 
Image
 
मुंबई : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी सुशीलाबाई यांचे निधन झाल्याची बातमी पुढे आली आहे. रविवार, १६ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
 
हे वाचलंत का? -  आम्ही कधीच फोडाफोडीचं राजकारण केलं नाही; विकसित भारताच्या संकल्पावर लोकांचा विश्वास
 
मागील काही दिवसांपासून त्या आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी निलंगा येथील सिंदखेड रोडवरील शेतात सायंकाळी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, सूना, एक मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0