मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Hindurastra) प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभात देशभरातून विविध साधू महंत आले आहेत. त्यापैकी श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे महंत चेतन गिरी महाराज यांनी हिंदुराष्ट्राला उल्लेखत एक भाकित केले आहे. भारत लवकरच हिंदुराष्ट्र होईल आणि तेव्हा चलनी नोटा बदलून नोटांवर भगवान श्रीरामाचे चित्र छापले जाईल.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे भाकित केलंय.
हे वाचलंत का? : समस्यांना तोंड देण्यासाठी हिंदूंची तत्परता महत्त्वाची!
भारत देश परकीय आक्रमकांच्या जाच्यातून मुक्त व्हावा यासाठी गेले अनेक काळ प्रयत्न सुरु आहेत. मुघलांनी हिंदूच्या प्रतिकांवर आक्रमणं करून त्याठिकाणी आपले वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. मुघलांनी उद्ध्वस्त केलेली सर्व मठ मंदिरे हिंदूराष्ट्रात पुनर्स्थापित केली जातील, असेही महंत चेतन गिरी महाराज यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.