कोकणात उबाठा गटाला खिंडार! माजी आमदार सुभाष बने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

    15-Feb-2025
Total Views |

Thackeray 
 
रत्नागिरी : माजी आमदार सुभाष बने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने उबाठा गटाला कोकणात खिंडार पडले आहे. शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
 
रत्नागिरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उबाठा गटाचे माजी आमदार सुभाष बने, उबाठा जिल्हा प्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद बाळशेठ जाधव, प्रशांत सुर्वे, तालुका प्रमुख संदीप सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
 
हे वाचलंत का? -  लव्ह जिहाद रोखण्यासाठी गठित समिती महिला आणि संस्कृती रक्षणाचे काम करेल
 
दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंचे शिलेदार राजन साळवी यांनी त्यांना सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत असतानाच आता पुन्हा एकदा कोकणात उबाठा गटात मोठे भगदाड पडले आहे.