लखनौ : महाकुंभ ही आपल्या देशाची आस्था असून ती बघून जगभरातील लोक अचंबित झाले आहेत, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी ते प्रयागराज येथे दाखल झाले असून त्यांनी सहकुटुंब महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केले.
हे वाचलंत का? - सुरेश धस यांनी घेतली धनंजय मुंडेची भेट! चर्चांना उधाण
याप्रसंगी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "१४४ वर्षांनंतर महाकुंभाचा योग आला आहे. अशावेळी स्नान करण्याची संधी मिळाली, ही आनंदाची गोष्ट आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करतो. इथे खूप सुंदर व्यवस्था करण्यात आली असून येणारा प्रत्येक व्यक्ती आनंदात आहे. ज्याप्रमाणे श्रद्धाळू लोक इथे येऊन महाकुंभात स्नान करत आहेत त्यामुळे याठिकाणी एक नवीन इतिहास आणि नवीन रेकॉर्ड बनत आहे. महाकुंभ ही आपल्या देशाची आस्था आहेच, पण जगभरातील अनेकांना या इथल्या व्यवस्थेने आश्चर्यचकीत केले आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.