भाजपने गाठला १ कोटी सदस्य नोंदणीचा ऐतिहासिक टप्पा! मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

10 Feb 2025 19:03:14
 
Bawankule
 
मुंबई : भाजपने १ कोटी १ कोटी सदस्य नोंदणीचा ऐतिहासिक टप्पा गाठला असल्याची माहिती महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवार, १० फेब्रुवारी रोजी दिली.
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्या 'एक्स' अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हणाले की, "महाराष्ट्र भाजपने १ कोटी सदस्य नोंदणीचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. हा यशस्वी प्रवास पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या अथक परिश्रम आणि निष्ठेचा परिणाम आहे. पक्षाच्या विचारधारेप्रती त्यांची निस्वार्थ सेवा आणि लोकांसाठीचे योगदान या ऐतिहासिक यशाचा पाया आहे. या यशात योगदान दिलेल्या प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला सलाम. एक कोटी सदस्यांचा हा टप्पा महाराष्ट्र विधानसभेतील भारतीय जनता पार्टीच्या ऐतिहासिक यशानंतरचा कळसाध्याय आहे. असेच एकजूट होऊन आपण पुढे वाटचाल करूया आणि विकसित भारताच्या संकल्पात विकसित महाराष्ट्र करून योगदान देऊया," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
हे वाचलंत का? -  मुंबईसह नागपूरमध्येसुद्धा ताज हॉटेल सुरु करा!
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात पक्षातर्फे राज्यभरात प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. दरम्यान, याद्वारे राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्य तयार करण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यातील १ कोटीचा टप्पा पार झाला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0