भारतातील पाकिस्तान वसाहतीचे 'भागीरथ' असे नामांतरण

स्थानिक प्रशानाचा मोठा निर्णय

    01-Feb-2025
Total Views |
 
Bhagirath colony
 
अमरावती (Bhagirath colony) : आंध्रप्रदेश राज्यातील विजयवाडा या जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून पाकिस्तान नावाची एक वसाहत आहे. मात्र आता त्या पाकिस्तान वसाहतीचे नामांतरण करण्यात आले आहे. तिचे नामांतरण करून भागीरथ कॉलनी असे नामांतरण केले. अनेक वर्षांपासून या वसाहतीचे नामांतरण कसे होईल अशी मागणी केली जात होती. मात्र आता त्यावर स्थानिक प्रशासनाने भागीरथ असे नामांतरण करत शिक्कामोर्तब केला आहे.
 
महापालिकेच्या अधिनियमनाच्या कलम ४१८ अन्वये अधिकाऱ्यांनी वसाहतीचे नाव बदलले आहे. नाव बदलल्यानंतर स्थानिक लोकांच्या ओळखपत्रांवरील म्हणजेच आधारकार्डवरील रहिवाशांचे पत्ते बदलण्यात आले आहेत. प्रसारमाध्यमानुसार ६० जणांनी आपल्या आधारकार्डमधील पत्ते बदलले आहेत. नामांतर केल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
 
१९७१ साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. त्यावेळी भारताचा विजय झाला होता. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि पूर्व पाकिस्तान हा बांगलादेश झाला होता. तत्कालीन परिस्थितीत अनेक निर्वासितांनी  भारतात वास्तव्य केले होते. तत्कालीन भारत सरकारने बेघर असलेल्यांना तसेच देशातील काही ठिकाणी वास्तव करणाऱ्यांची मदत केली.
 
विजयवाडामध्ये एका ठिकाणी निर्वासितांचे वास्तव्य होते. लोकांनी या वसाहतीला पाकिस्तान असे नाव दिले होते. तेव्हापासून ते लोक त्याला पाकिस्तान असे संबोधू लागले होते. त्यामुळे संबंधित वस्तीला पाकिस्तान अशा नावाने ओळखू निर्माण झाली होती. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर आता महापालिकेने याची दखल घेत वसाहतीचे नाव नामांतरण केले आहे.