मुंबई : (Goa nightclub fire) गोव्यतील अर्पोरा येथील 'बर्च बाय रोमियो लेन' नाईटक्लबला शनिवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता त्या क्लबचे मालक दिल्लीतील व्यवसायिक सौरभ लुथरा आणि त्याचा भाऊ गौरव लुथरा देश सोडत पळून गेले असल्याची माहिती गोवा पोलिसांनी माध्यमांना दिली. (Goa nightclub fire)
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दि. ६ डिसेंबरला 'बर्च बाय रोमियो लेन' नाईटक्लबला आग लागून, ही दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर या क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि त्याचा भाऊ गौरव लुथरा हे रविवारी ७ डिसेंबरला सकाळी ५:३० वाजता दिल्लीहून इंडिगोच्या 6E-1073 विमानाने थायलंडकडे रवाना झाले. (Goa nightclub fire)
हेही वाचा : बंगालमध्ये गीतापाठानिमित्ताने उसळला भगवा जनसागर!
या घटनेनंतर, सौरभ लुथरा याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत म्हटले होते की, “बर्च येथील दुर्दैवी घटनेमुळे झालेल्या दुःखद जीवितहानीमुळे व्यवस्थापन तीव्र दुःख व्यक्त करते आणि त्यांना खूप धक्का बसला आहे.” त्यासोबतच त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांना “सर्व शक्य स्वरूपात” मदत आणि पाठिंबा देण्याची ऑफर देखील दिली होती. (Goa nightclub fire)
त्यासोबतच, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये अनिता, कमला आणि सरोज जोशी या तीन बहिणी आणि दुसऱ्या बहिणीचा पती विनोद कुमार यांचा समावेश होता. सोमवारी दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Goa nightclub fire)