Maharashtra Assembly : विधिमंडळाच्या दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली

08 Dec 2025 17:48:01
 
Maharashtra Assembly
 
मुंबई : (Maharashtra Assembly) महाराष्ट्र विधानसभा सभागृहाने माजी मंत्री, माजी आमदार यांच्या निधनाबद्दल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवार दि.८ रोजी शोक प्रस्ताव एकमताने मंजूर केला.
 
"कै. शिवाजीराव कर्डिले, महादेवराव शिवणकर, भारत बोंद्रे, श्याम उर्फ जनार्दन अष्टेकर, यशवंत दळवी, नारायण पटेल, सिद्रामप्पा मलकप्पा पाटील, गिल्बर्ट मेंडोंसा, राजीव देशमुख आणि श्रीमती निर्मला ठोकळ या लोकप्रतिनिधी व समाजसेवकांनी शिक्षण, सहकार, शेती, क्रीडा, जलसंधारण, उद्योग, आरोग्य, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. या दिवंगत सदस्यांनी विधानसभा, लोकसभा, पालिका, जिल्हा परिषद, सहकारी संस्था, शिक्षणसंस्था यामधून दीर्घकाळ जनसेवा केली. त्यांच्या निधनामुळे राज्याची अपरिमित हानी झाली आहे."असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी नमूद केले. (Maharashtra Assembly)
 
हेही वाचा :  Vande Mataram : वंदे मातरम्‌ व राज्यगीताने हिवाळी अधिवेशनाच्या विधान परिषदेच्या कामकाजास सुरूवात...
 
शोक प्रस्ताव मंजूर करताना सदस्यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. शोक प्रस्तावानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. (Maharashtra Assembly)
 
 
Powered By Sangraha 9.0