Vande Mataram : वंदे मातरम्‌ व राज्यगीताने हिवाळी अधिवेशनाच्या विधान परिषदेच्या कामकाजास सुरूवात...

    08-Dec-2025
Total Views |
Vande Mataram
 
मुंबई : (Vande Mataram) विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची 'वंदे मातरम्‌' (Vande Mataram) व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने विधानपरिषदेत सुरुवात झाली. वंदे मातरम् गीतास ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वंदे मातरम् (Vande Mataram) गीताचे संपूर्ण गायन करण्यात आले.
 
हेही वाचा :  Winter Session : हिवाळी अधिवेशनाचे बिगुल वाजले; पहिल्या दिवशी ७५ हजार २८६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
 
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्रिमंडळ सदस्य व विधान परिषद सदस्य उपस्थित होते.