Goa nightclub fire : गोव्यातील एका नाईटक्लबला लागलेल्या भीषण आगीत कर्मचाऱ्यांसह २५ जणांचा मृत्यू!

07 Dec 2025 12:57:31

मुंबई : (Goa nightclub fire) गोव्याच्या किनारी भागातील एका लोकप्रिय नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत क्लबमधील कर्मचाऱ्यांसह २५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्यांमध्ये काही पर्यटकांचा समावेश असल्याचे देखील समजत आहे. शनिवार दि. ६ डिसेंबरला क्लबच्या (Goa nightclub fire) स्वयंपाकघरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे ही भीषण आग लागल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक पोलीसांकडून वर्तवला जात आहे.
 

हेही वाचा :  भारतीय नौदल : पूर्व-पश्चिम समुद्राचे निर्विवाद अधिपती


 
दरम्यान रविवारी सकाळी माध्यामांवरून मिळालेल्या माहितीनुसार, ही भीषण आग मध्यरा‍त्रीच्या सुमारास लागली. आग आटोक्यात आणल्यानंतर पोलिस क्लबमध्ये शिरले असता त्यांना बहुतेक मृतदेह हे स्वयंपाकघराभोवती आढळले, त्यामुळे मृतमध्ये क्लबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मोठ्याप्रमाणात समावेश असल्याचे म्हटले जात आहे. (Goa nightclub fire)
 

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, तीन जणांचा मृत्यू हा भाजल्यामुळे झाला, तर काही जणांचा मृत्यू गुदमरून झाला आहे. त्यासोबतच मृतांमध्ये ३-४ पर्यतकांचा समावेश आहे, मात्र त्यांच वय आणि राष्ट्रीयत्व अद्याप समजलेले नाही. (Goa nightclub fire)
 

 
Powered By Sangraha 9.0