Uday Samant : गुजरातने आता चक्क हापूस आंबा त्यांचा असल्याचा दावा केलाय! यावर मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

06 Dec 2025 15:14:22
 Uday Samant
 
मुंबई : (Uday Samant) केवळ भारतात नाही, तर संपूर्ण जगभरातील खवय्याचा आवडता हापूस नेमका कोणाचा असा यावरून आता चक्क वाद निर्माण झालाय. आपल्या कोकणी हापूसवर आता गुजरातने दावा केला आहे. गुजरातने वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी केली आहे. कोकणाला २०१८ मध्ये मिळालेल्या मानांकनामुळे कोकणी हापूसला सुरक्षित बाजारपेठ मिळाली होती. मात्र आता होत असलेल्या दाव्यांमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Uday Samant)
 
हेही वाचा :  Bhiwandi Nizampur City Municipal Corporation : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
 
दरम्यान मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे याविषयी बोलताना म्हणाले, वलसाडचा येऊ दे किंवा कर्नाटकचा येऊ देत फरक पडत नाही. रत्नागिरी देवगडच्या हापूसला कुणीही बाजूला करू शकत नाही. एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या वलसाड या नावाच्या आंब्यावरन तुम्हाला असं वाटतं का? देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल. शेवटी आणची चव जी आहे, मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे. आमच्या हापूस आंब्याला कोणीही बाजूला करू शकत नाही हे जगीनं सिद्ध केल आहे. (Uday Samant)
 
 
Powered By Sangraha 9.0