Bhiwandi Nizampur City Municipal Corporation : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

    06-Dec-2025
Total Views |
Bhiwandi Nizampur City Municipal Corporation
 
ठाणे : (Bhiwandi Nizampur City Municipal Corporation) महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचे पत्र दि. 02.12.2025 च्या पत्रान्वये आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे (Bhiwandi Nizampur City Municipal Corporation) मा. प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर यांचे निर्देशानुसार आज दिनांक 06.12.2025 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिका (Bhiwandi Nizampur City Municipal Corporation) मुख्यालयात तळ मजल्यावर मा. उपायुक्त (मुख्यालय) विक्रम दराडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. तद्नंतर महानगरपालिका मुख्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती पुतळ्यास उपायुक्त (मुख्यालय) विक्रम दराडे आणि माजी नगरसेवक विकास निकम यांचे हस्ते व जुन्या इमारतीजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धपुतळ्यास मुख्य लेखा व वित्त अधिकारी रामप्रसाद सोळुंके यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.(Bhiwandi Nizampur City Municipal Corporation) 
 
हेही वाचा : Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारक पुढच्या वर्षी ६ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, म्हणाले...
 
या प्रसंगी मा. उपायुक्त (कर) बाळकृष्ण क्षिरसागर, सहायक आयुक्त (निवडणूक) अजीत महाडीक, माजी नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती, निवृत्त शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड व महानगरपालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.(Bhiwandi Nizampur City Municipal Corporation)