Thackeray Brothers : नागपूर पालिका निवडणूकीत ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक!

31 Dec 2025 16:09:04
 Thackeray Brothers
 
नागपूर : (Thackeray Brothers) नागपूर महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची युती तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईसह काही महानगरपालिकांमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात नागपूरमध्ये मात्र जागावाटपावर एकमत होऊ शकले नसल्याचे माध्यमांवरून समोर येत आहे. (Thackeray Brothers)
 
हेही वाचा :  BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी भाजपची १३७ उमेदवारांची यादी जाहीर, सविस्तर वाचा
 
नागपूरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेने तब्बल ५८ जागांवर उमेदवार दिले असून, मनसेने स्वतंत्रपणे २३ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे नागपूरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. (Thackeray Brothers)
 
हे वाचलात का ? : Municipal Corporation : मुंबईचे रस्ते आणि प्रवाशांचे खस्ते, महापालिकेचे धोरण शून्य 
 
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, जागावाटप आणि स्थानिक नेतृत्वावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाल्याने युती टिकू शकली नाही. त्यामुळे नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे (Thackeray Brothers) एकमेकांसमोर थेट लढताना दिसणार आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0