Municipal Corporation : मुंबईचे रस्ते आणि प्रवाशांचे खस्ते, महापालिकेचे धोरण शून्य
31-Dec-2025
Total Views |
मुंबई : (Municipal Corporation) मुंबई ही जलद गतीने धावणारी नगरी म्हटली जाते. सकाळ पासून रात्री पर्यंत मुंबई जागतच असते. पण मुंबईतील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून हा वेग या असुविधेमुळे थांबला जातोय. महानगरपालिकेत (Municipal Corporation) सत्ता असूनही गेली २५ वर्षे यावर उबाठा आणि त्यांच्या नेतृत्वाला यावर उत्तर शोधता आले नाही. मुंबईकरांना भेडसावणाऱ्या महत्वाच्या समस्यांपैकी ट्रॅफिक जाम ,रस्ते व खड्ड्यांची समस्या मोठी असून अनेक मुंबईकरांना वाईट रस्त्यांमुळे त्रास सोसावा लागतो आहे. भाजपने निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या सर्वेक्षणात ६५ टक्के मुंबईकरांनी रस्त्यांची समस्या सर्वाधिक त्रासदायक असल्याचे म्हटले आहे. तर रस्त्यांच्या दुर्दशेवर त्वरित तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचेही मत ६० टक्के मुंबईकरांनी व्यक्त केले आहे.(Municipal Corporation)
पावसाळ्यात तर मुंबापुरीची तुम्बापुरी झालेली पाहायला मिळते. त्यात भर म्हणजे पावसात रस्त्यातील खड्डे दिसत नसल्याने होणारे अपघात आणि जाणारे बळी याला सामान्य मुंबईकर त्रस्त झालेला आहे.मुंबईतील सगळे रस्ते गुळगुळीत करणार अशी घोषणा महापालिका ताब्यात असलेले उबाठा नेते करतात पण प्रत्यक्ष स्थिती याच्या विरुद्ध आहे. खड्डे बुजवणे हे काम अद्ययावत यंत्रणेद्वारे शक्य असताना देखील कामगारांद्वारे डांबर टाकून ते हाताने साध्या पद्धतीने सपाट करणारी मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation) ही देशातील श्रीमंत महानगरपालिका म्हणायची का?(Municipal Corporation)
२०२५ च्या जून आणि जुलै महिन्यात रस्त्यातील खड्ड्यांमुळे बी के सी मेट्रो स्टेशनजवळ १३ वर्षीय मुलाचा ,मुंबई- नाशिक महामार्गावर २० वर्षीय तरुणाचा ,भिवंडी वाडा रस्त्यावर युवकाचा तर पवईतील रस्त्यावर दुचाकी स्वराचा जीव घेतला होता.अशी आकडेवारी गेल्या २५ वर्षात काढली तर थक्क करणारी असेल.या खड्ड्यांमुळे आणि ट्रॅफिक जाममुळे वाया जाणारे तास किती आर्थिक भुर्दंड घालत असतील हे सांगायलाच नको. ट्रॅफिक जाममुळे सामान्य मुंबईकरांचे दरवर्षी किमान १२१ तास वाया जातात.तर ट्रॅफिक जाममुळे मुंबईचे ४१० अब्ज रुपयांचे नुकसान होत असते असा अंदाज आहे.(Municipal Corporation)
२०१८ साली आर जे मलिष्काने मुंबईतील खड्ड्यांवर गाणे पण केले होते जे तेव्हा खूप वायरल झाले होते. 'मुंबई तुला बी एम सी वर भरोसा नाय का , मुंबई तुला पावसावर भरोसा नाय का' असे ते बोल होते त्यानंतर तिने झिंगाट थीम वर पण ' गेली गेली मुंबई खड्ड्यात ' हे गाणे मुंबईच्या रस्त्यातील दुरावस्थेवर केले होते.(Municipal Corporation)