Sadananda Date : एनआयएचे प्रमुख सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक!

03 Dec 2025 17:58:39
 
Sadananda Date
 
मुंबई : (Sadananda Date) राज्याच्या विद्यमान DGP रश्मी शुक्ला या ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होणार असून, आता त्याच्या जागी वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते (Sadananda Date) यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या पदासाठी एनआयएचे प्रमुख सदानंद दाते (Sadananda Date) यांच्यासह सात जणांची यादी मंजुरीसीठी यूपीएससीकडे पाठवण्यात आली होती. त्यानंतर आज अखेर दाते याची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी निवड करण्यात आली आहे.
 
हेही वाचा :  Expired Goods : पाकिस्तानचा निर्लज्जपणा उघडकीस!
 
विद्यमान DGP रश्मी शुक्ला या ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर सदानंद दाते (Sadananda Date) हे महाराष्ट्राच्या पोलीस सहसंचालकाचा पदभार स्वीकारतील. त्यासोबतच दातेंचा कार्यकाळ हा डिसेंबर २०२७ पर्यंत असणार आहे.
 
सदानंद दाते (Sadananda Date) यांचा कार्याचा ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत प्रभावी आहे. केंद्रीय यंत्रणांसोबत काम करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. विशेषतः २६/११ च्या मुंबई हल्ल्यात त्यांनी जुन्या कार्बाइनसह दहशतवाद्यांचा सामना केला होता. त्यांच्या सतर्ककेमुळेच ओलिसांना सुरक्षितपणे पळून जाता आले होते. त्यावेळी दाते (Sadananda Date) यांना दहशतवाद्यांच्या गोळ्या देखील लागल्या होत्या. त्यामुळे त्यांचा प्रचंड आदर केला जातो.
 
 
Powered By Sangraha 9.0