मुंबई : (Expired Goods) श्रीलंका सध्या ‘दित्वाह’ चक्रीवादळामुळे गंभीर संकटाचा सामना करत आहे. अशाप्रसंगी शेजारी देश म्हणून भारताने पुढाकार घेऊन श्रीलंकेला मदतीचा हात दिला. सुमारे १२ टन अत्यावश्यक वस्तूंची मदत भारताद्वारे गरजूंसाठी श्रीलंकेत पाठवण्यात आली. एनडीआरएफची टीम सुद्धा लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम करत आहेत. अशातच आधीच कंगाल असलेल्या पाकिस्तानने श्रीलंकेला मदत पाठविण्याचा दिखावेपणा केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कोरडे अन्नधान्य, औषधे, तंबू व इतर साहित्य पाठवले. मात्र ही सामग्री जेव्हा आपत्तीग्रस्तांच्या हातात पोहोचली तेव्हा बहुतांश वस्तूंची मुदत संपलेलेल्याचे (Expired Goods) लक्षात आले.(Expired Goods)
अशी माहिती आहे की, पाकिस्तानकडून पाठवलेल्या मदतसामग्रीमध्ये फूड पॅकेट्स, औषधे, प्राथमिक उपचारकिट, कोरडे अन्नधान्य, तंबू आणि इतर आवश्यक वस्तू होत्या. कोलंबो येथील पाकिस्तानी दूतावासाने मदत पोहोचल्याचे फोटो शेअर करून ते दोन देशांतील मैत्रीचे प्रतिक असल्याचा दावा केला. मात्र पोलखोल झाल्यानंतर पाकिस्तान अशा कामातसुद्धा किती बेफिकीर असू शकतो हे पुन्हा एकदा दिसून आले.(Expired Goods)
पाकिस्तानी दूतावासाने समाजमाध्यमांवर पोस्ट करत लिहिले की, “अलीकडील पुरामुळे प्रभावित आमच्या बंधू-भगिनींसाठी पाकिस्तानकडून पाठवलेली मदत यशस्वीपणे श्रीलंकेत पोहोचली. हे आमच्या दृढ एकतेचे प्रतिक आहे. पाकिस्तान आज आणि सदैव श्रीलंकेसोबत उभा आहे.”(Expired Goods)
पाकिस्तानी दूतावासाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये स्पष्ट दिसतेय की, अनेक अन्नपॅकेट्स आणि औषधांवर २०२४ ची एक्सपायरी तारीख (Expired Goods) दिसत होती. त्यामुळे स्वाभाविकच अधिकारी आणि जनता दोघेही संतप्त झाले. श्रीलंका सरकारने तातडीने पाकिस्तानकडे या बेपर्वाई प्रकरणी निषेध नोंदवला. या प्रकरणातून पाकिस्तानची बेपर्वाई, भ्रष्टाचार आणि व्यवस्थेतील कुचराईपणा पुन्हा एकदा उघड झाला.(Expired Goods)
यापूर्वीसुद्धा पाकिस्तानकडून पाठवलेल्या मदतीवरून वाद निर्माण झाले होते. नेपाळ भूकंपाच्या वेळी त्यांनी बीफयुक्त ‘रेडी-टू-ईट’ पॅकेट्स पाठवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या वेळीही पाकिस्तानने भारतावर खोटा आरोप केला की भारताने हवाई मार्ग देण्यास नकार दिला. भारताने हे आरोप तात्काळ फेटाळून लावत पाकिस्तानचा खोटेपणा उघड केला.(Expired Goods)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक