मुंबई : (Shahajibapu Patil) सांगली येथे आयोजित एका राजकीय सभेत आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाला मतदान करणाऱ्यांना थेट स्वर्गप्राप्ती होईल, असा दावा त्यांनी आपल्या भाषणात केला. (Shahajibapu Patil)
हेही वाचा : Rakhee Jadhav : निवडणूकीच्या तोंडावर शरद पवार गटाला धक्का; राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश
सभेत बोलताना शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) म्हणाले, “तुम्ही निवडणूक जिंकलात किंवा हरलात, हे वेगळं. पण ज्यांनी ज्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मत दिलं आहे, त्यांना देव कधीही नरकात घेणार नाही. त्यांची जागा स्वर्गातच निश्चित आहे.” त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच चर्चा रंगली. या वक्तव्यादरम्यान त्यांनी (Shahajibapu Patil) अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरही टीकास्त्र सोडले. धार्मिक संकल्पनांचा वापर करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.