Rakhee Jadhav : निवडणूकीच्या तोंडावर शरद पवार गटाला धक्का; राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश

    29-Dec-2025   
Total Views |
Rakhi Jadhav
 
मुंबई : (Rakhee Jadhav) ऐन निवडणूकीच्या तोंडावर शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. आ. पराग शाह यांच्या उपस्थितीत मुंबई जिल्हा अध्यक्ष राखी जाधव (Rakhee Jadhav) या भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
 
गेल्या अनेक वर्षांपासून राखी जाधव या मुंबईत शरद पवार गटाचे नेतृत्व करत होत्या. पण आगामी निवडणूकांच्या जागावाटपात पक्षाला कमी जागा मिळाल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे सांगण्यात येते. शरद पवार गटासमोर युतीसाठी मुंबईत काँग्रेस आणि उबाठा गट असे दोन पर्याय आहे. यापैकी कुणासोबत युती करणार, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. (Rakhee Jadhav)
 
हेही वाचा : BJP : भाजपची पहिली यादी जाहीर
 
विकासासाठी निर्णय घेतला - राखी जाधव
 
भाजप प्रवेशानंतर राखी जाधव (Rakhee Jadhav) म्हणाल्या की, "मुंबई शहराच्या हितासाठी आणि माझ्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आणि मुंबई शहरात झपाट्याने होत असलेल्या विकासकामांप्रमाणेच घाटकोपरमध्येसुद्धा विकासकामे व्हावीत, यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. शरद पवार यांच्या पक्षात असताना अपेक्षित प्रतिसाद आला नाही. कार्यकर्ता हा आपल्या नेत्याकडे व्यक्त होत असतो. पण त्याकडे नेता दुर्लक्ष करत असेल तर कार्यकर्ता एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचतो. भाजपच्या माध्यमातून या शहराचा विकास होत असून आपणसुद्धा त्यात सहभागी व्हावे, यासह अनेक कारणांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला," असे त्या म्हणाल्या. (Rakhee Jadhav)
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....