मुंबई : (UBT) छत्रपती संभाजीनगरमधील उबाठा (UBT) गटाचे निष्ठावान नेते अॅड. हर्षवर्धन त्रिभुवन यांनी शिवसेना विभागप्रमुख, सोशल मीडिया समन्वयक पदासह शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे निवडणूकांच्या तोंडावर उबाठा गटाला मोठा धक्का बसला. (UBT)
अॅड. हर्षवर्धन त्रिभुवन आपल्या राजीनामा पत्रात म्हणाले की, "छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी पूर्वी अशी प्रतिज्ञा केली होती की, उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यावरच क्लीन शेव्ह करेल. २००५ साली शिवसेनेचा सर्वात युवा उमेदवार म्हणून अशा वॉर्डात निवडणूक लढवली ज्या वॉर्डमध्ये शिवसेनेचा उमेदवार उभा राहत नव्हता. माझे नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर २००१ च्या विराट सभेमध्ये घेतले होते, याचा मला सदैव अभिमान आहे आणि तो अभिमान कायम राहील. युवासेना प्रमुख आदित्य साहेब नेहमीच संभाजीनगरला आल्यावर आवर्जून मला भेटायचे आणि पक्षातील काम कसे चालू आहे हे विचारायचे." (UBT)
२७ वर्षांचा प्रवास थांबवला
परंतू, आज निष्ठावान शिवसैनिकांना डावलले जात आहे आणि अन्याय होत आहे. शेवटी स्वाभिमान महत्वाचा म्हणून २७ वर्षांचा प्रवास थांबवत आहे, असे म्हणत अॅड. हर्षवर्धन त्रिभुवन यांनी उबाठा गटाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. (UBT)