मुंबई : (Salman Khan) बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आज, २७ डिसेंबर २०२५ रोजी, आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने खान कुटुंबीय, सलमानचे (Salman Khan) जवळचे मित्रमंडळी आणि काही नातेवाईक पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसकडे रवाना झाले आहेत. कालपासूनच फार्महाऊसवर जोरदार पार्टी सुरू असून, वाढदिवसाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सलमान खानने आपल्या कारकिर्दीत एकाहून एक सुपरहिट चित्रपट देत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. ६० वर्षांचा असूनही सलमान आजही फिट आणि फाईन दिसतो, हे त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच कौतुकाचा विषय ठरतो. (Salman Khan)
हेही वाचा : महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत १९० नवीन मतदान केंद्रे; एकही केंद्र अतिसंवेदनशील नाही
सलमान खान (Salman Khan) म्हटलं की त्याच्यासोबत त्याचा विश्वासू बॉडीगार्ड शेरा हे नाव हमखास घेतलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून शेरा सलमानच्या सावलीसारखा त्याच्यासोबत आहे. सलमानवर झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये शेराने त्याला सुरक्षित ठेवत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. दोघांमधील नातं हे मालक-नोकराचं नसून भावंडांसारखं असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे.
सलमान खानच्या (Salman Khan) वाढदिवसानिमित्त शेराने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शेराने लिहिलं आहे, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझे मालक सलमान खान. मी तुम्हाला असंख्य चढउतारांमध्ये साथ दिली आहे. या सगळ्यात एक गोष्ट कधीच बदलली नाही—प्रत्येक आव्हानाला स्टाईल, सामर्थ्य आणि शांतपणे सामोरे जाण्याची तुमची पद्धत. म्हणूनच तुम्ही फक्त स्टार नाही, तर सर्वात मोठे सुपरस्टार आहात. तुमच्यामुळेच मला आज इतकं प्रेम आणि आदर मिळतो आहे. तुमच्यामुळे मला अशी ओळख मिळाली आहे ज्याचा मला खूप अभिमान वाटतो. देव तुम्हाला नेहमी सुख, यश आणि उत्तम आरोग्य देवो. सुरक्षित रहा, मालक…”