Navnath Ban : गावकीपुढे भावकी चालत नाही ; नवनाथ बन यांची टीका

27 Dec 2025 17:03:37
 
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) संजय राऊत यांनी कितीही मोट बांधण्याचा प्रयत्न केला तरी ती बांधली जाणार नाही. गावकीपुढे भावकी चालत नाही, अशी म्हण आहे. त्यामुळे भावकीची मोट अपयशी असून मुंबईकरांची गावकी महायुतीसोबत आहे, अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
 
हेही वाचा :  UBT : स्वाभीमान महत्वाचा म्हणत ठाकरेंच्या निष्ठावानाचा राजीनामा
 
निष्ठावानांना डावलून दलालांना उमेदवारी
 
नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले की, "उबाठा गटाचे खा. संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे राजकारण कमी बडबड जास्त, ठामपणा कमी तडजोड जास्त आणि तत्व कमी तडफड जास्त अशी होती. पण त्यांनी कितीही बडबड केली तरी मुंबईकर तुम्हाला साथ देणार नाही. तुमचा आत्मविश्वास संपला असून मुंबईकरांना आरडाओरड नको तर, विकास हवा आहे. संजय राऊत यांचा संपूर्ण पक्ष निराशेच्या गर्तेत आहे. अनेक निष्ठावान हिंदुत्ववादी शिवसैनिक डावलले असून दलालांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रामाणिक शिवसैनिक उबाठा गटासोबत नसून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. मुंबई बॅाम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा, छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध करणारा राशीद मामू, खान, शेख यांच्यासह बुरखाधारी उबाठा गटाचे स्टार प्रचारक आहेत. याकुब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करणे हा त्यांचा पहिला अजेंडा आहे," असेही ते म्हणाले. (Navnath Ban)
 
संजय राऊत यांचा एकही दावा खरा ठरत नाही
 
"भाजपचा पराभव करण्यासाठी तुम्हाला खूप तडजोड करावी लागणार आहे. पण कितीही तडफड केली तरी जनतेचे आशीर्वाद भाजपच्या पाठीशी आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कुणी कुणी आपली घरे भरली हे जनतेने बघितले असून उबाठा गट हा मेवा खाणारा पक्ष असल्याचे जनतेने ओळखले आहे. संजय राऊत यांनी ११५ जागा जिंकण्याचा दावा करू नये. विधानसभेवेळी त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील असे सांगितले. पण त्या दाव्याचे काय झाले? राऊत यांचा आजपर्यंतचा एकही दावा खरा ठरला नाही. त्यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा नवीन व्यवसाय सुरु केला असावा," असा टोलाही त्यांनी लगावला.
 
हे वाचलात का ?: वनवासी कल्याण आश्रम स्थापना दिन व वनयोगी बाळासाहेब देशपांडे जयंती साजरी  
 
मनसेच्या इंजिनाला डबे नाहीत
 
"भाजप-शिवसेना एकत्रित लढत आहे. याऊलट उबाठा गटाला मनसेच्या नगरसेवकांचा पराभव करायचा आहे. राज ठाकरे यांना २०-२५ जागा मिळाल्यास ते आपल्यासोबत राहतील की, नाही याची खात्री नसल्याने जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न उबाठा गटाचा आहे. महापालिका ही सेवा नसून उबाठा गटासाठी फॅमिली बिझनेस आहे. मुंबईचा सेवक हाच नगरसेवक होईल. ठाकरेंचा सेवक नगरसेवक होणार नाही. मनसेचे इंजिन आहे, पण डबे नाहीत. सातत्याने युटर्न घेतल्याने कार्यकर्ते दुरावले," अशी टीकाही नवनाथ बन (Navnath Ban) यांनी केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0