वनवासी कल्याण आश्रम स्थापना दिन व वनयोगी बाळासाहेब देशपांडे जयंती साजरी
27-Dec-2025
Total Views |
मुंबई : ( vanvasi kalyan ashram founders day celebrated in mumbai ) वनवासी कल्याण आश्रम, कोकण प्रांत घाटकोपर व मुलुंड भाग यांच्या वतीने वनवासी कल्याण आश्रमाचा स्थापना दिन तसेच संस्थापक वनयोगी बाळासाहेब देशपांडे जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अखिल भारतीय प्रचार व प्रसार प्रमुख प्रमोद पेठकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांच्या कार्याचा आढावा घेत वनवासी कल्याण आश्रमाच्या देशभर विस्तारलेल्या कार्याची माहिती दिली. समाजाच्या सहभागातून सुरू असलेल्या छात्रावासांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आश्रमाच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक माध्यमांचा योग्य व प्रभावी वापर कसा करावा, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास डॉ. राम शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन अपर्णा हिंगणे यांनी केले, तर प्रास्ताविक सुनीता सावंत यांनी मांडले. प्रमुख वक्त्यांचा परिचय सुमेधा करंदीकर यांनी करून दिला. वक्त्यांचा सत्कार ममता निमकर यांच्या हस्ते करण्यात आला. मिनलताई गव्हाणकर यांच्या सांघिक गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे नियोजन शिवशंकर हिंगणे यांनी केले, तर आभार सरोज दास यांनी मानले. या कार्यक्रमास वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.