Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्रांकडून बाबुलनाथ मंदिराकडे लीजची प्रत सुपूर्द

25 Dec 2025 12:06:33
 
Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : (Chandrashekhar Bawankule) मुंबईतील श्री बाबुलनाथ मंदिरासाठी महसूल विभागाने श्री बाबुलनाथ मंदिर चॅरिटिजला नाममात्र एक रुपया दरात तीस वर्षांसाठी भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करून दिले. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बुधवारी सकाळी यासंदर्भातील शासन निर्णयाची प्रत मंदिराच्या विश्वस्तांना दिली.
 
हेही वाचा : अगतिकांची युती, महाराष्ट्राच्या माथी!
 
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. मिहिर कोटेचा यांच्यासह विश्वस्त नितीनभाई ठक्कर, प्रदीपभाई श्रॉफ, जितुभाई ठक्कर उपस्थित होते. बाबुलनाथ मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भक्तांना विविध नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी या जागेची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. आमदार मिहीर कोटेचा यांनी या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा केला, तर स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांनीही याबाबत शिफारस केली होती. अखेर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही जागा आता अधिकृतपणे ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आली असून, त्याचा उपयोग केवळ भाविकांच्या सेवेसाठीच केला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. (Chandrashekhar Bawankule)
 
 
Powered By Sangraha 9.0