Thackeray Brothers : आज मनसे-उबाठा युतीची अधिकृत घोषणा, आधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आदरांजली

24 Dec 2025 11:59:43
 Thackeray Brothers
 
मुंबई : (Thackeray Brothers) राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) यांची बहुप्रतिक्षित युती आज अधिकृतपणे जाहीर होणार आहे. दुपारी १२ वाजता वरळी येथील हॉटेल ब्लू सी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली जाणार आहे. (Thackeray Brothers)
 
हेही वाचा : ठाकरेंना ‘हात’ द्या!
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या युतीला दुजोरा दिला असून, जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती दिली आहे. या युतीमुळे आगामी मुंबई, ठाणे, कल्याण, मीरा-भाईंदर, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसे आणि ठाकरे गट एकत्र लढणार आहेत. पत्रकार परिषद होण्यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्क येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहणार आहेत. (Thackeray Brothers)
 
 
 
Powered By Sangraha 9.0