मुंबई : (Osman Hadi) इंकिलाब मंचचा संयोजक शरीफ उस्मान बिन हादी यांच्या हत्येसाठी अंतरिम सरकार जबाबदार असल्याचा आरोप उस्मान हादी याचा भाऊ शरीफ ओमर बिन हादी (Osman Hadi) याने केला आहे. ओमरने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला उस्मानचे संरक्षण करण्यात अपयश आले. उस्मानची (Osman Hadi) हत्या सध्याच्या सरकारच्या देखरेखीखाली झाली. या निष्काळजीपणासाठी सरकारला शेवटी खटल्याला सार्मोरे जावे लागेल असा इशारा ओमर याने दिला.
हेही वाचा : मुस्लिमांसाठी देश प्रिय आहे, पण पूजनीय नाही; मौलाना महमूद मदनी यांचे वादग्रस्त वक्तव्य
हाती आलेल्या माहितीनुसार, ओमर याने नमूद केले की, भावाच्या हत्येचा फायदा घेऊन सरकारकडून सार्वत्रिक निवडणुकांमध्ये व्यत्यय आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सरकारची ही चाल कधीही यशस्वी होणार नाही असे त्याने सांगितले. उस्मान हादी (Osman Hadi) याने फेब्रुवारीमध्ये देशात निवडणुका घेण्याचा आग्रह धरला होता आणि त्यासाठी सक्रिय तयारी देखील केली होती. परंतु त्याची हत्या ही निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी करण्यात आली असल्याची शंका देखील ओमर याने व्यक्त केली. (Osman Hadi)
हे वाचलात का ?: Devendra Fadnavis : ठाकरेंचा ट्रॅक रेकॉर्ड हा भ्रष्टाचाराचा आणि स्वहिताचा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत शेख हसीना म्हणाल्या की, उस्मान हादीची (Osman Hadi) हत्या ही सध्याच्या अंतरिम सरकारच्या काळातील अराजकतेचे प्रतिबिंब आहे. बांगलादेशात हिंसाचार हा एक सामान्य प्रकार बनला आहे. अशा घटना बांगलादेशला अंतर्गतदृष्ट्या अस्थिर करतात. बांगलादेशने शेजारी देशांशी असलेले आपले संबंध देखील सुधारले पाहिजेत. आज बांगलादेशात अराजकता, अल्पसंख्याकांचा छळ चालू आहे आणि यामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्हता कोसळली आहे. मुहम्मद युनूसच्या काळातील बांगलादेशचे सध्या हेच वास्तव आहे. (Osman Hadi)