मुंबई : ( Maulana Madani ) नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी यावेळी देशविरोधी वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेशच्या देवबंद येथून एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, मुस्लिम अल्लाहशिवाय इतर कोणाचीही पूजा करत नाहीत आणि इस्लामचे मूलभूत तत्व 'तौहीद' वर कोणतीही तडजोड केली जात नाही. भारत देश मुस्लिमांना प्रिय असला तरी तो पूजनीय नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना मदनी यांनी वादग्रस्त आणि देशविरोधी वक्तव्य केले. सरकार्यवाहांनी एका कार्यक्रमात आपण भारतीय निसर्गपूजक आहोत. त्यामुळे ज्या निसर्गाच्या आधारे आपण जीवन जगत असतो, त्या नद्या, झाडे, सूर्य आणि इतर गोष्टींची पूजा करावी, असे म्हटले होते.
हेही वाचा : Bangladesh Protests: बांग्लादेश आता ‘हत्यांच्या युगात’ प्रवेश करत आहे; ‘द डेली स्टार’च्या संपादकांचा धक्कादायक ईशारा
सरकार्यवाह यांच्या विधानावर मदनी म्हणाले की, मुस्लिम अल्लाहशिवाय कोणाचीही पूजा करत नाहीत. एकेश्वरवादावरील मुस्लिमांचा विश्वास आणि त्यांची उपासना पद्धत कोणत्याही बुद्धिमान व्यक्तीपासून लपलेली नाही. अल्लाहव्यतिरिक्त झाडे, पृथ्वी, सूर्य, समुद्र किंवा नद्यांची पूजा करण्यास सांगणे म्हणजे मुस्लिमांना त्यांची मुलभूत तत्वे सोडायला लावण्यासारखे आहे.