नवी दिल्ली : (Bangladesh Protests) बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. देशातील एका हिंदू नागरिकासोबत घडलेल्या हिंसक घटनांमुळे परिस्थिती अधिकच चिघळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २३ डिसेंबर रोजी झालेल्या नियमित पत्रकार परिषदेत संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले, “होय, बांगलादेशात आपण पाहत असलेल्या हिंसाचाराबद्दल आम्हाला प्रचंड चिंता आहे.” (Bangladesh Protests)
हेही वाचा : भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘गोल्डीलॉक्स’
दरम्यान, नवी दिल्लीतील बांगलादेश (Bangladesh Protests) उच्चायुक्तालयाने “सध्याच्या सुरक्षा परिस्थितीचे कारण देत” व्हिसा देणे तात्पुरते बंद केले आहे, अशी माहिती माध्यमांवरून सोमवार दि. २२ डिसेंबर रोजी देण्यात आली. १२ डिसेंबर रोजी कट्टरपंथी नेता शरीफ उस्मान हादी याच्या गोळीबारात झालेल्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारात जमावाने भारतातील बांगलादेश (Bangladesh Protests) व्हिसा अर्ज केंद्रांनाही लक्ष्य केल्याने भारताने ती केंद्रे बंद केली होती. (Bangladesh Protests)
हे वाचलात का ?: नापास खासदार
या पार्श्वभूमीवर भारतातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी कोलकात्यातील बांगलादेश (Bangladesh Protests) उपउच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने केली. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या कथित हल्ल्यांचा त्यांनी तीव्र निषेध केला. विशेषतः, हिंदू समुदायातील दीपू चंद्र दास यांच्या लिंचिंगनंतर हे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये वाढत चाललेल्या अस्थिरतेमुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात असून, परिस्थितीवर संयुक्त राष्ट्रांसह अनेक देश बारकाईने लक्ष ठेवून आहेत. (Bangladesh Protests)